For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून सेवेत

06:55 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
वंदे भारत स्लीपर ट्रेन  17 जानेवारीपासून सेवेत
Advertisement

पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावेल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केली. पश्चिम बंगालमधील मालदा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होईल. ही गाडी कामाख्या आणि हावडा जंक्शन दरम्यान सहा दिवस धावेल. या स्लीपर ट्रेनसोबतच सहा नवीन अमृत भारत एक्स्प्रेस देखील सुरू केल्या जाणार असून 17 आणि 18 जानेवारीपासून त्याही प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दिल्ली येथे गुरुवारी अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात वैष्णव यांनी नव्या रेल्वेंची घोषणा केली. भारतीय रेल्वेने 2026 मध्ये एक मोठे परिवर्तन घडवत सर्व प्रकारच्या सुधारणांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा व्यापक वापर समाविष्ट करण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले. भारतातील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण विचारांना रेल्वेशी जोडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला जाईल. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासाठी एक नवीन संरचनात्मक दृष्टिकोन सुरू केल्यामुळे भारतातील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण विचारांना रेल्वेशी जोडता येईल. यासाठी एक तंत्रज्ञान नवोन्मेष पोर्टल सुरू केले जाईल. देखभालीच्या कामांसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल, असे रेल्वेमंत्र्यांनी कार्यक्रमात जाहीर केले.

तिकीट दरही निश्चित

थर्ड एसी वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे 2,300 निश्चित करण्यात आले आहे. तर, सेकंड एसी क्लासचा तिकीटदर 3 हजार रुपये असणार आहे. फर्स्ट एसीचे भाडे अंदाजे 3,600 रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. स्लीपर ट्रेनची रचना 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस सुमारे 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. 30 डिसेंबर रोजी या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. कोटा-नागदा रेल्वे ट्रॅकवर ही ट्रेन ताशी 180 किलोमीटर वेगाने धावली. या चाचणीवेळी लोको पायलटने चार ग्लासमध्ये पाणी ठेवले होते. मात्र, इतक्या वेगाने ट्रेन धावत असतानाही ग्लासमधून पाणी सांडले नव्हते.

Advertisement
Tags :

.