महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डिसेंबरपासून ‘वंदे भारत’ धावण्याची शक्यता

12:10 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिवेशनापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : वंदे भारत या आलिशान रेल्वेमधून प्रवास करण्याचे बेळगावकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. शुक्रवार दि. 1 डिसेंबरपासून बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने तयारी सुरू केली असून अधिवेशनापूर्वी वंदे भारत सुरू झाल्यास याचा फायदा प्रशासकीय अधिकारी तसेच आमदारांना होणार आहे. बेंगळूर-धारवाड मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. बेळगाव-बेंगळूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास नैर्त्रुत्य रेल्वेला होता. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने वंदे भारतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे पाठविला होता. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी नैर्त्रुत्य रेल्वे तसेच रेल्वे बोर्डकडे वेळोवेळी केलेल्या मागणीमुळे वंदे भारतसाठी चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

मंगळवार दि. 21 रोजी बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससाठी चाचणी घेण्यात आली. नैर्त्रुत्य रेल्वेने दिलेल्या अचूक वेळेत एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल झाली तर परतीच्या प्रवासात बेंगळूरला वेळेत पोहोचली. यशस्वीरित्या चाचणी पूर्ण झाल्याने आता एक्स्प्रेस केव्हा सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. वंदे भारतचा तिकीट दर काहीसा अधिक असला तरीही कमी वेळेत आलिशान प्रवास करण्यासाठी तिकीट थोडे जास्त देण्यासाठी प्रवाशांनी तयारी केली आहे. सोमवार दि. 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 1 डिसेंबरपासून बेंगळूर-बेळगाव मार्गावर एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. लवकरच तिकीट दरही जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बेळगावमधील नागरिकांना वंदे भारतचा प्रवास करता येईल.

वंदे भारतचे प्रस्तावित वेळापत्रक

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article