महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वंदे भारत एक्स्प्रेस संभाजीनगर स्टेशनच्या बाहेर जाऊ देणार नाही; एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा इशारा

07:43 PM Dec 29, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

जालन्याहून मुंबईसाठी उद्या पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र यालोकार्पण सोहळ्याला छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Advertisement

दरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन केले आहे. इम्तियाज जलील यांना वंदे भारत लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण न दिल्याबद्दलरेल्वे प्रशासनाचा निषेध करत, जर निमंत्रण पत्रिकेत इम्तियाज जलील यांचं नाव छापलं नाही तर वंदे भारत संभाजीनगर स्थानकाबाहेर जाऊ दिली जाणार नाही, असा इशाराही एमआयएम कार्यकर्त्यांनी रेल्वेला दिला आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#sambhajinagaremtiyajjalilmimvandebharatvandebharatexpressworkers
Next Article