वंचित बहूजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश! मुंबईतील मविआच्या बैठकीमध्ये महत्वपुर्ण निर्णय
गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीमधील प्रवेशावरून मविआच्या नेत्यांमध्ये आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये रंगलेलं मानापमान नाट्य आज अखेर संपल आहे. वंचित बहूजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश झाल्याचं अधिकृत पत्र आज जारी करण्यात आलं. वंचित बरोबर आम आदमी पार्टी, सीपीआय, सीपीआयएम, शेकाप यासारख्या पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.
असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पत्र पोस्ट केलं आहे.
2024 च्या लोकसबा निवडणुका जसजश्या जवळ येतील तसतसे राजकिय वातावरण तापत आहे. गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीमध्ये प्रवेशावरून वंचित बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मानापमानाचे नाट्य सुरु होते. आता हे नाट्य संपले असून आज मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकिमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वंचित बरोबर आम आदमी पार्टी, सीपीआय, सीपीआयएम, शेकाप यासारख्या पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे. आज बैठकीनंतर यासंदर्भातील पत्र महाविकास आघाडीने सार्वजनिक केलं.
मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकिमध्ये प्रकाश आंबेडकर स्वता हजर राहणार असे बोलले जात होते. पण वंचितचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावतीनं आज बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हजर राहीले. पण त्यांना आता मुख्य बैठकिला बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून यावर लवकरच अध्यक्ष या नात्याने प्रकाश आंबेडकर निर्णय घेतील असं म्हटले आहे. त्यानंतर काही वेळातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या एक्स या सोशलमीडीया अकाउंटवर वंचितचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश झाल्याचं पत्र पोस्ट केलं.
या पत्रात प्रकाश आंबेडकर हे हुकुमशाही विरुध्द लढत असून त्याबद्दल महाविकास आघाडी त्यांचे आभारी आहे. त्यामुळेच वंचित बहूजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश व्हावा अशी आमच्या सर्वांची इच्छा असल्याचे पत्रात म्हटले आहे.