वनश्री, नीना, केआर शेट्टी, गोकाक संघ विजयी
तनिष्क चषक टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा : सुनील पाटील, जयदेव, आनंद के, मनीष घाटगे यांना सामनावीर पुरस्कार
बेळगाव : अमोदराज स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक निमंत्रितांच्या टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत गोकाक क्रिकेट क्लबने रायजिंग स्टारचा, केआर शेट्टीने एमसीसीचा, वनश्री गोकाकने वामिकाचा तर नीना स्पोर्ट्सने माळमारुती संघाचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुनील पाटील, जयदेव, आनंद के, मनीष घाटगे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रायजिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी बाद 88 धावा केल्या. श्रेयसने 22 तर गजाननने 20 धावा केल्या. गोकाकतर्फे आनंद के., आणि प्रितीम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक क्लबने 16.2 षटकांत 5 गडी बाद 90 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला.
युसुफ अलीने 5 चौकारासह 32, विल्समने 20, आनंद के.ने 13 धावा केल्या. रायजिंगतर्फे संदेश व सिद्धू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात एमसीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 152 धावा केल्या. मलिक रेहानने 5 चौकारासह 35, आक्रम 6 चौकारासह 33 तर गौसपी हाजीने 28 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे राहुलने 2 तर मनीषने 1 गडी बाद केला. त्यानंतर केआर शेट्टीने 17.2 षटकांत 7 गडी बाद 153 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. मनीष घाटगे व विशाल जी.ने प्रत्येकी 4 चौकारासह 31 धावा केल्या. प्रशांतने 5 चौकारांसह 25 धावा केल्या. एमसीसीतर्फे दादापीर हाजी व आक्रम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात वनश्री गोकाक संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 117 धावा केल्या.
हासनने 3 चौकारासह 36 तर सुनीलने 3 चौकारांसह 31 धावा केल्या. वामिकातर्फे विकी व नागराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वामिकाने 20 षटकात 8 गडी बाद 107 धावा केल्या. सुनीलने 2 षटकार, 1 चौकारासह 43, रुपचंदानीने 19 धावा केल्या. वनश्रीतर्फे सुनील पाटीलने 4, लक्ष्मीकांतने 3, एम.व्ही.डी.ने 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात नीना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी बाद 147 धावा केल्या. ऋतुराज भाटीने 9 चौकारासह 65 तर समर्थ चौगुलेने 59 धावा केल्या. माळमारुतीतर्फे रवीने 2, परसुने 1 गडी बाद केला. त्यानंतर माळमारुतीचा डाव 19.3 षटकांत 106 धावांत आटोपला. रवीने 6 चौकारांसह 43, एम. बी.पाटीलने 16 धावा केल्या. नीनातर्फे जयदेवने 5, अक्षय व अशिष यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.