‘जी2’मध्ये दिसणार वामिका गब्बी
अदिवीसोबत जमणार जोडी
अभिनेत्री वामिका गब्बी अलिकडेच वरुण धवनसोबत बेबी जॉन या चित्रपटात दिसून आली होती. वामिका आता विनय कुमार सिरिगिनीदी यांच्याकडून दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट ‘जी2’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट अदिवीचा 2018 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘गुडाचारी’चा सीक्वेल असणार आहे. वामिका या चित्रपटाच्या फ्रँचाइजीच्या पुढील भागात इमरान हाश्मी आणि अदिवी शेषसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.
वामिका गब्बीने जी2 चित्रपटाविषयी माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. स्पाय, अॅक्शन, अॅडव्हेंजर जी2 असे म्हणत तिने अदिवी शेषसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले आहे. वामिकाला प्राइम व्हिडिओ सीरिज ‘जुबली’, नेटफ्लिक्स सीरिज ‘खुफिया’ आणि सोनीलिव्ह सीरिज ‘चार्ली चोपडा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग वॅली’तील अभिनयासाठी ओळखले जाते. वामिकाने वरुण धवन आणि किर्ती सुरेशसोबतचा चित्रपट बेबी जॉनमधील अभिनयासाठी कौतुक मिळविले होते.
तर जी2 या चित्रपटात अदिवी शेष आणि वामिकासोबत इमरान हाश्मी, मुरली शर्मा, सुप्रिया यार्लाग•ा आणि मधु शालिनी हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटासोबत अदिवी हा डकैत या चित्रपटातही दिसून येणार आहे. यात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेनिल देव करत आहे.