For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तमिळ चित्रपटात दिसणार वामिका गब्बी

06:29 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
तमिळ चित्रपटात दिसणार वामिका गब्बी
Advertisement

लोकेश कनगराजचे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

Advertisement

तमिळ चित्रपटसृष्टीचा ब्लॉकबस्टर दिग्दर्शक लोकेश कनगरराजला मास्टर, कैथी, लियो, विक्रम आणि कूली या चित्रपटांसाठी ओळखले जाते. लोकेश आता दिग्दर्शनानंतर अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. त्याच्या अभिनयातील पदार्पणाच्या चित्रपटाचे नाव डीसी असून याची झलक सादर करण्यात आली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वामिका गब्बी आणि संजना कृष्णमूर्ती मुख्य भूमिकेत आहे.

हा चित्रपट मे महिन्याच्या आसपास प्रदर्शित होणाराह आहे. रक्तपात आणि हिंसेने भरलेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण मथेश्वरन यांनी याचीच पटकथा लिहिली आहे. मथेश्वरन याने यापूर्वी रॉकी, सानी कायधाम आणि कॅप्टन मिलर यासारखे चित्रपट दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.