For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन’मध्ये वामिक

01:00 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन’मध्ये वामिक
Advertisement

दिग्दर्शक लोकेश कनगराज लवकरच अभिनय करताना दिसून येणार आहे. त्याचा नवा चित्रपट ‘डीसी द ब्लडी व्हॅलेंटाइन“चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात नायिका म्हणून वामिका गब्बी झळकणार आहे. चित्रपटात ती  रोमान्ससोबत अॅक्शनही करताना दिसून येईल. याचा ट्रेलर एका अशा जगाची रोमांचक झलक दाखवितो, जेथे क्राइम, रोमान्स आणि सूड परस्परांशी धडकत असतात

Advertisement

देवदास (लोकेश कनगराज) केवळ स्वत:च्या भूतकाळापासून नव्हे तर कायद्यापासूनही पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या होताच सर्वकाही बिघडून जाते आणि त्याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू होतो. याचबरोबर एका गुन्हेगारी टोळीची चौकशी सुरु असते, जिने शस्त्रास्त्रs चोरली आहेत. ही दोन्ही प्रकरणे हळूहळू परस्परांशी जोडली जातात आणि देवदास  गुन्हेगार, उग्रवादी आणि पोलिसांदरम्यान अडकून पडतो.

अरुण मथेश्वरन याच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. करण जौहरचे धर्मा प्रॉडक्शन्स हा चित्रपट उत्तर भारतात वितरित करणार आहे.

Advertisement

Advertisement

.