For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आघाडीवरच्या 6 कंपन्यांच्या मूल्यात 1 लाख कोटींची वाढ

06:06 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आघाडीवरच्या 6 कंपन्यांच्या मूल्यात 1 लाख कोटींची वाढ
Advertisement

मुंबई :

Advertisement

शेअरबाजारातील 10 पैकी 6 आघाडीवरच्या कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 1 लाख कोटींची वाढ झाली आहे. यात दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल ही सर्वाधिक मूल्य वाढ करणारी ठरली आहे.

मागच्या आठवड्यात एअरटेलचे मूल्य 36,529 कोटींनी वाढत 11.63 लाख कोटी रुपयांवर पोहचले. याशिवाय बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एचडीएफसी बँक व हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवल मूल्यात वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे 4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र घसरण दिसली आहे. यात लार्सन टुब्रो, रिलायन्स, एसबीआय आणि टीसीएस यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.