महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वळिवाची सतत हुलकावणी : शेतकरी प्रतीक्षेत

09:04 PM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेती व्यवसायाचे तंत्र बिघडले, शेतकरी चिंतेत, पिके करपू लागली, मशागतीच्या कामात व्यत्यय

Advertisement

वार्ताहर/ उचगाव

Advertisement

बेळगावच्या पश्चिम भागामध्ये वळिवाच्या फसगतीने शेती व्यवसायाचे तंत्रच बिघडत चालल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. वेळेत वळीव तर वेळेतच मशागत आणि वेळेतच पेरणी हंगाम शेतकरी साधत असतो. मात्र चालू वषीचा हंगाम पाहता वळिवाच्या पूर्णत: फसगतीमुळे शेती व्यवसायच अडचणीत येत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करताना दिसून येत आहेत.

यंदाच्या हंगामासाठी लागणाऱ्या वळीव पावसाच्या सततच्या हुलकावणीमुळे पश्चिम भागातील शेतकरी वर्गासमोर मोठ्या समस्या निर्माण होताना दिसून येत आहेत. एप्रिल-मे हे दोन महिने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या दोन महिन्यांमध्ये जर वेळेत वळीव पाऊस जोरदार झाला तरच जमिनीतील रान उगवण्यास मदत होते. यानंतर शेतीची मशागत करून या शेतीत भात पिकाची पेरणी सुलभरीत्या होत असते. मात्र मे महिन्याला प्रारंभ झाला तरी अद्याप वळीव या भागात झाला नसल्याने शेतीतील रान कसे उगवणार, यानंतर शेतीची मशागत कशी करणार आणि भाताची पेरणी कशी साधली जाणार, या चिंतेत शेतकरी अडकला असल्याचे दिसून येत आहे.

पेरणी वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना फटका

रब्बी हंगामात माळ जमिनीमध्ये बटाटे, मिरची, रताळी, भुईमूग, कोबी, बिनीस, गवार, फ्लॉवर, कोथिंबीर, मका, नवलकोल, मेथी, जोंधळा याबरोबरच विविध भाजीपाला यांची लागवड केली जाते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाताची पेरणी ही जर योग्यवेळी झाली तर पुढील हंगाम शेतकऱ्याला वेळेत साधता येतो. आणि जर वेळेत वळीव झाला नाही, शेतीची मशागत झाली नाही तर भाताच्या बियाणांची पेरणी देखील वेळेत होत नसल्याने पुढील सर्वच पिकांचे तंत्रच बिघडून जाते आणि याचा मोठा फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो, यासाठी वेळेत वळीव होणे अत्यंत गरजेचे आहे.

चिंता आणि फक्त चिंता अशी आज शेतकरी वर्गाची अवस्था बनली आहे. एकीकडे शेती व्यवसायात नवीन युवा पिढी सहभागी होत नाही. शेती व्यवसाय करण्यासाठी शेतात राबणारी, काम करणारा कामगार वर्ग मिळत नाही. घरातील मुले-मुली कॉलेज शिक्षणानंतर नोकरीसाठी बाहेर, परगावी वास्तव्य करून आहेत. अशा परिस्थितीत असलेल्या घरातील शेतकरी कुटुंबातील वडीलधाऱ्या, वयस्कर माणसांनी आता शेती कशी करावी, शेती कशी सांभाळावी, हा मोठा यक्षप्रŽ त्यांच्यासमोर सतावताना दिसून येत आहे.

दुसरीकडे निसर्ग साथ देत नाही, वेळेत पाऊस होत नाही. परिणामी अशा या आस्मानी संकटात अडकलेला शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र आजच्या घडीला सर्वत्र दिसून येत आहे. तसे पाहिले तर शेतकरी वर्षभर कष्ट करतो, शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, पिके घेतो. मात्र त्याला जो हवासा दर पाहिजेत तो त्याला मिळत नाही. शेतीला म्हणावा तसा दर मिळत नाही. शेती आहे म्हणून फक्त शेती करायची असा रिवाज आज शेतकऱ्यांसमोर पडल्याचे दिसून येत आहे. यातच निसर्गाची अवकृपा असल्याने दिवसेंदिवस या परंपरागत शेती तंत्रामध्ये कमालीचा बदल होताना दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article