For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वालावल येथे ६ रोजी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा; खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

11:29 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
वालावल येथे ६ रोजी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा  खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
Advertisement
वालावल : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कुडाळ तालुकास्तरीय किशोर व किशोरी गटाची कबड्डी निवड चाचणी स्पर्धा शुक्रवार, दि. ६ रोजी सकाळी ८ वाजता एन. ए. एस. डी. विद्यालय, वालावल येथे आयोजित करण्यात आली आहे.

या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या किशोर गटातील खेळाडूंची जन्मतारीख ३१ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची असणे आवश्यक असून, वजन मर्यादा ६० किलो आहे. किशोरी गटासाठी जन्मतारीख ३१ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची आणि वजन मर्यादा ५५ किलो निश्चित करण्यात आली आहे.

Advertisement

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी रंगीत झेरॉक्ससह आधारकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र व निर्गम उतारा, शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्टुडंट आयडी असलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूच्या छायाचित्रावर मुख्याध्यापकांची अर्धसाक्षांकित सही असलेली प्रत आणावी. इयत्ता पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा आणि जन्मदाखला सोबत आणणे बंधनकारक आहे.

यावर्षी इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरल्यानंतरची मुख्याध्यापकांच्या सहीसह प्रि-लिस्ट प्रत सादर करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.

Advertisement

या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कबड्डी असोसिएशनचे अॅड. अजित भणगे आणि सचिव जी. एम. सामंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका संघटक संतोष गोसावी (९४०४७८००८७) यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement
Tags :

.