For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत १४, १५ मार्च रोजी वैश्य वाणी प्रिमिअर लीग

05:37 PM Feb 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत १४  १५ मार्च रोजी वैश्य वाणी प्रिमिअर लीग
Advertisement

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे आयोजन

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून वैश्य वाणी प्रिमिअर लीगचे आयोजन १४ व १५ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी दिली. सावंतवाडी शहर मर्यादीत ही क्रिकेट स्पर्धा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्यावतीने या क्रिकेट लीगच आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक २५ हजार व द्वितीय पारितोषिक १५ हजार असणार आहे. वैश्य बांधवांनी आपल्या संघाच्या माध्यमातून यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. गवंडळकर यांनी केलं. तर, सामाजिक कार्य आम्ही या युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नुकतेच कॅन्सर हॉस्पिटलला संघटनेकडून मदत करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रम देखील या संघटनेकडून राबविण्यात येणार असल्याचे शैलेश गवंडळकर यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी सल्लागार अरूण भिसे म्हणाले, वैश्य समाजातील युवक व महिलांना संघटित करण्याचा आमचा हेतू आहे. वैश्यवाणी प्रिमिअर लीग सावंतवाडीत व्हावी यासाठी आम्ही नियोजन केल आहे. कोलगाव, माजगाव, चराठा या गावातील समाजबांधव यात सहभागी असणार आहेत. या सर्वांची मिळून ही स्पर्धा होणार आहे. यानंतर तालुका व जिल्हा स्तरावर ही स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. शहरातून आम्ही याची सुरुवात करत असून 4 मार्च पर्यंत खेळाडूंनी नावं द्यायची असून 8 तारीखेला लिलाव होणार आहे अशी माहिती श्री. भिसे यांनी दिली. यावेळी हिंदू वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, सल्लागार अरूण भिसे, प्रसाद नार्वेकर, बंड्या कोरगावकर, आबा केसरकर, श्रेयस मुंज, शैलेश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रशांत वाळके, जयेश स्वार, महेश बांदेकर, ऋतिक कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, सलील वंजारी, रूपेश कुडतरकर, महेश देऊलकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.