For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vairag Murder Case | वैराग हादरले! "पोलीस तक्रार का दिली?" या कारणावरून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून मारले

05:28 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
vairag murder case   वैराग हादरले   पोलीस तक्रार का दिली   या कारणावरून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून मारले
Advertisement

                            वैरागमध्ये मित्राकडून मित्राचा खून

Advertisement

वैराग -वैराग येथील दत्तनगर परिसरात "पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास का पाठवले?" या कारणावरून तरुणाने आपल्या संतापलेल्या मित्रालाच दगडाने ठेचून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर, ता. बार्शी) असे आहे. याबाबत त्याचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे (वय २९) यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.घटनेपूर्वी १ मे रोजी रात्री दिनेश कापसे हा आपल्या मित्रांसह दारू पिण्यास गेला होता. त्यावेळी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे, दिनेश ऊर्फ पिल्लू चव्हाण व इतर मित्रउपस्थित होते. दारू पित असताना बबलू मुळे व पिल्लू चव्हाण यांच्यात किरकोळ बाद झाला. या बादात बबलू मुळे याने लोखंडी हुकाने पिल्लू चव्हाण याच्या हातावर मारहाण केली.

Advertisement

प्रसंग शांत करताना दिनेश कापसे याने जखमी पिल्लू चव्हाण यास "पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दे" असे सांगितले. मात्र, हाच मुद्दा आरोपी बबलू मुळेच्या मनात घर करून राहिला. त्याने त्याचवेळी दिनेश कापसे यास "तुला बघून घेतो" अशी धमकी दिली होती.यानंतर बबलू मुळे हा दिनेश कापसे यास मोटारसायकलवर बसवून "घरी सोडतो" असे सांगत घेऊन गेला. परंतु, २ मे रोजी पहाटेएकच्या सुमारास त्याला नवीन मराठी प्राथमिक शाळा, दत्तनगर येथील मैदानात नेण्यात आले. तेथे "तू पिल्लू चव्हाणला तक्रार देण्यास का पाठवले?" या कारणावरून आरोपीने संतापाच्या भरात मोठा दगड उचलून दिनेश कापसे यांच्या डोक्यात बार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.दरम्यान, सकाळी वैराग पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती.

मात्र, त्याच्या मोबाईलवरआलेल्या कॉलवरून त्याची ओळख निश्चित झाली. ज्ञानेश्वर कापसे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले असता त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बबलू मुळे हा त्या परिसरात फिरताना दिसून आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर कापसे यांच्या फिर्यादीवरून उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२, रा. दत्तनगर, बैराग) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वैराग पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.