For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळात लवकरच वैकुंठ रथ सेवा

05:53 PM Mar 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळात लवकरच वैकुंठ रथ सेवा
Advertisement

सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम ; ओंकार तेली यांची संकल्पना

Advertisement

कुडाळ -

एखाद्याच्या मृत्यूनंतर दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक ओझे कमी व्हावे.तसेच मृत व्यक्तीचा अंतिम प्रवास सन्मानाने व्हावा.या हेतूने कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या संकल्पनेतून कुडाळातील प्रसिद्ध व्यापारी सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात येत आहे.या वैकुंठ रथाचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मृतदेह घरी किंवा स्मशानभूमीत नेण्यासाठी खासगी वाहनांकडून आकारले जाणारे अवास्तव भाडे अनेकांसाठी परवडणारे नसते. अशा वेळी संबंधित कुटुंबाला नाईलाजाने जादा पैसे मोजावे लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कुडाळ शहरासह तालुक्यात ओंकार तेली यांनी आपले वडील सुधीर तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैकुंठ रथ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक, आरोग्य आणि सास्कृतिक क्षेत्रात ओंकार तेली यांचा मदतीचा हात पुढे असतो. सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळावी.यासाठी त्यांचे प्रयत्न असतात.यापूर्वी श्री.तेली यांनी वातानुकुलित शवपेटीची मोफत सेवा सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे व ही सेवा गेले 8 वर्षे सुरू आहे.कणकवली व सावंतवाडी येथे उपलब्ध असलेली वैकुंठ रथ सेवा आता कुडाळमध्येही सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मृत व्यक्तीचा अखेरचा प्रवास अधिक सन्मानाने होणार आहे.या रथामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंतिम प्रवासात माणुसकीचा हात देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाबाबतची माहिती ओंकार तेली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.