For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले; आरोपी संधी साधत दुपारी बारा वाजता घरी आला आणि...., वैभववाडीतील खळबळजनक घटना

02:53 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
तरुणीचे आई वडील कामानिमित्त घराबाहेर गेले  आरोपी संधी साधत दुपारी बारा वाजता घरी आला आणि      वैभववाडीतील खळबळजनक घटना
Advertisement

वैभववाडी : तालुक्यातील एका गावातील तरुणीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन सदर तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जांभवडे येथील दशरथ आत्माराम बोलये (४५) याच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांसमवेत राहते. १५ सप्टेंबर रोजी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी दुपारी सुमारे १२ वाजता संशयित आरोपी घरी आला. त्याने तरुणीला जीवे मारण्याची तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता संशयित पुन्हा तरुणीच्या घरी आला आणि त्याने पुन्हा अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घडलेली घटना आपल्या चुलत बहिणीला सांगितली. चुलत बहिणीने याबाबत तिच्या आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर पीडित तरुणीने वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार वैभववाडी पोलिसांनी शनिवारी सकाळी संबंधित कलमांनुसार गुन्हा तसेच अॅट्रॉ सिटीचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement

.