For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैभव सूर्यवंशीच्या सर्वात जलद 400 धावा

06:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
वैभव सूर्यवंशीच्या सर्वात जलद 400 धावा
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान रॉयल्सचा वंडरबॉय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने यावर्षीच्या आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वात जलद (चेंडूंच्या बाबतीत) 400 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याने केवळ 167 चेंडूत 400 धावा पूर्ण केल्या आहेत. 15 वर्षीय वैभवने हा विक्रम पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यावेळी केला. त्याची ही कामगिरी अन्य काही स्फोटक फलंदाजांना मागे टाकणारी ठरली आहे. याआधी हा विक्रम केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसेलच्या नावावर होता. त्याने 2019 च्या आयपीएलमध्ये 188 चेंडू हा टप्पा गाठला होता. भारताचा अभिषेक शर्मा तिसऱ्या, निकोलस पूरन चौथ्या व ग्लेन मॅक्सवेल पाचव्या स्थानावर आहे. 2026 च्या मोसमात वैभव हा चारशे धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने केवळ 9 सामन्यात 44.44 च्या सरासरीने व 238.09 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने या धावा बनविल्या आहेत. त्यात एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. प्रारंभापासूनच आक्रमक फटकेबाजी करण्याचे धोरण हे या आयपीएलमधील वैशिष्ट्या ठरले आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 400 करणारे पहिले पाच फलंदाज

Advertisement

  • क्रम       फलंदाज                संघ                  चेंडू        मोसम
  • 1          वैभव सूर्यवंशी        राजस्थान             167       2026
  • 2          आंद्रे रसेल              केकेआर             188       2019
  • 3          अभिषेक शर्मा        हैदराबाद               195       2024
  • 4          निकोलस पूरन        लखनौ                   197       2025
  • 5          ग्लेन मॅक्सवेल         पंजाब                    200       2014.
Advertisement
Tags :

.