For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान भारतीय संघात

06:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
वैभव सूर्यवंशी  संजू सॅमसन  इशान भारतीय संघात
Advertisement

अफगाणविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा : बुमराहचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, बुमराहला मालिकेत खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे आवश्यक असणार आहे. उभय संघातील मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Advertisement

भारतीय संघात 7 खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यात जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रे•ाr, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाचा भाग असलेल्या 8 खेळाडूंना मात्र वगळण्यात आले आहे. यात रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा आणि यश ठाकूर यांचा समावेश आहे. दुसरीकडे, अफगाणविरुद्ध मालिकेसाठी निवड समितीने संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीवर विश्वास दाखवला आहे. यामुळे या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

बुमराहचे कमबॅक, इशान किशनलाही संधी

जसप्रीत बुमराह, नीतीश कुमार रे•ाr, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, मालिकेपूर्वी या चौघांनाही फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार आहे. याशिवाय, झिम्बाब्वे दौऱ्यात यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांनी भारताकडून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, आता दोघांनाही संघाबाहेर करण्यात आले आहे.

अफगाणनविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रे•ाr, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.

Advertisement
Tags :

.