वैभव सूर्यवंशीला 50 लाख रुपयांचे बक्षीस
वृत्तसंस्था/ पाटना
भारतीय युवा संघाने अलिकडेच आयसीसीची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध सलामीचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत 175 धावांची धडाकेबाज खेळी केल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार रे•ाr यांनी वैभवला 50 लाख रुपयांचा धनादेश बक्षीसादाखल देऊन त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
14 वर्षीय वैभवने अलिकडच्या वर्षभराच्या कालावधीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली असल्याने त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय युवा संघाने सहाव्यांदा आयसीसीची युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. आयसीसीच्या या स्पर्धेमध्ये सूर्यवंशीला मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार मिळाला होता. वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेत आपल्या वयाच्या 14 वर्षे, 23 दिवस झाले असताना पदार्पण केले. या स्पर्धेत पदार्पण करणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू आहे. आता मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष्य लागले आहे. तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. रविवारी झालेल्या समारंभावेळी वैभवचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसेच क्रीडा मंत्री श्रेयासीसिंग यांनी वैभवच्या कामगिरीचे कौतुक केले. हा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता.