आ. वैभव नाईकांनी केली सार्वजनिक.बांधकाम कार्यालयाची तोडफोड
05:12 PM Aug 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण | प्रतिनिधी
Advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद शिवप्रेमी आणि शिवसैनिकांकडून उमटण्यास सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी धरत थेट मालवण कार्यालयात जात कार्यालयाची तोडफोड केली .तसेच प्रत्येक कामात भ्रष्टाचार करत टक्केवारी घेत असता असा आरोप केला. छत्रपती आमची अस्मिता आहेत. छत्रपतींचा पुतळा पडण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागच दोषी आहे अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Advertisement
Advertisement