For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाअभावी सिंधुदुर्गातील भातशेती करपली; माजी आमदार वैभव नाईकांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; पंचनामे तातडीने करून सरसकट नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा

06:04 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाअभावी सिंधुदुर्गातील भातशेती करपली  माजी आमदार वैभव नाईकांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी  पंचनामे तातडीने करून सरसकट नुकसानभरपाई द्या  अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा
Advertisement

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने आणि वाढत्या उन्हामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भातपिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा भातशेतीवर परिणाम झाल्याचे अलीकडील पाहण्यांमधूनही समोर आले आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी आणि माणगाव परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही सिंधुदुर्गात भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झाले नसल्याचा आरोप नाईक यांनी केला. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

सरकारने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही नाईक यांनी दिला.

पावशी येथे झालेल्या पाहणीवेळी शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

त्यानंतर माणगाव कुंभारवाडी येथे शेतकरी पांडुरंग कुंभार तसेच माणगाव कोठीची राई परिसरातील हर्षद धुरी, सुभाष धुरी आणि उमेश देसाई यांच्या भातशेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

.