श्री देव रामेश्वर-नारायण पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक सहभागी
मालवण : प्रतिनिधी
ढोल ताशाच्या गजरात, गुलाल अन फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.दरवर्षीप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण देवतेचे दर्शन घेतले.यावेळी भाई गोवेकर, हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर,मंदार केणी, मंदार ओरसकर, बाबी जोगी,अन्वय प्रभू,सन्मेष परब,तपस्वी मयेकर,मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर,हेमंत मोंडकर,करण खडपे, सेजल परब,आकांक्षा शिरपुटे,माधुरी प्रभू,अक्षय भोसले आदींसह हजारोंच्या संख्येने मालवण वासीय उपस्थित होते.