For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

तारकर्लीतील जळीत बोट दुर्घटनेची वैभव नाईकांकडून पाहणी; कांदळगावकर कुटुंबीयांना आर्थिक मदत

06:16 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
तारकर्लीतील जळीत बोट दुर्घटनेची वैभव नाईकांकडून पाहणी  कांदळगावकर कुटुंबीयांना आर्थिक मदत
Advertisement
मालवण : तारकर्ली येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी जळीत बोट दुर्घटनेची गंभीर दखल घेत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेमुळे संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. तसेच ठाकरे शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

तारकर्ली येथे घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. दुर्घटनेचा फटका बसलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. संकटाच्या काळात पीडित कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने ठाकरे शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

Advertisement

या पाहणी दौऱ्यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, पूजा करलकर, राधिका मोंडकर, उमेश मांजरेकर, राजू मेस्त्री, गुंडू कांदळगावकर, राजाराम खराडे, अनिल टिकम, पप्पू चिंदरकर, दीपक लोणे, प्रभाकर राझम, अनिल केळुसकर, शाखाप्रमुख आबा केळुसकर आणि यतीन झाड यांच्यासह स्थानिक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तारकर्लीतील या दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबाला मदतीचा हात देत वैभव नाईक यांनी संवेदनशीलता दाखवली. या भेटीमुळे दुःखाच्या प्रसंगी कांदळगावकर कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला.

Advertisement

Advertisement
Tags :

.