For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आ . वैभव नाईकांनी केली पिंगुळीतील ठाकर आदिवासी कलादालनाची पाहणी

04:47 PM Jan 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आ   वैभव नाईकांनी केली पिंगुळीतील ठाकर आदिवासी कलादालनाची पाहणी
Advertisement

कलादालनाच्या कामासाठी २५ लाखांचा निधी मंजूर

Advertisement

कुडाळ-पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली.खासदार विनायक राऊत व आमदार श्री नाईक यांच्या माध्यमातून या कलादालनासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली ५० वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असताना विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून पिंगुळी येथे या आदिवासी लोककलेच्या कलादालनासाठी जिल्हा नियोजन निधी २०२१-२२ अंतर्गत २५ लाख रुपये निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अधिवेशन असल्याने भूमिपूजन सोहळ्याला आमदार नाईक यांना उपस्थित राहता आले नाही. या कलादालनाचे काम आता सुरु असून वैभव नाईक यांनी तेथे भेट देऊन कामाची पाहणी केली.तसेच चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याच्या सूचना केल्या. कलादालनासाठी लागणारा उर्वरित निधी देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासित केले.तसेच चित्रकला प्रशिक्षणातील चित्रांची श्री नाईक यानी पाहणी केली. पद्मश्री परशुराम गंगावणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, गुरुनाथ सडवेलकर आदि उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.