सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गौतम आणि शीतलचे वैभव नाईकांकडून अभिनंदन
11:34 AM Jan 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
मालवण तालुक्यातील कट्टा येथील गौतम दीपक भोगटे व शीतल उदय वायंगणकर हे दोन्ही विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटंट ( सी. ए.) परीक्षेत उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आपल्या यशातून कट्टा गावाच्या नावलौकिकात या विद्यार्थ्यांनी भर टाकली आहे.त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख शिवा भोजने, ग्रा. प. सदस्य बाबू टेंबुलकर,दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम, शाखा प्रमुख बाबल गावडे,किशोर पेंडुरकर,अण्णा मोरजकर, जगू मोरजकर,संतोष म्हाडगूत,श्री रेवडेकर यांसह भोगटे आणि वायंगणकर कुटुंबीय उपस्थित होते.
Advertisement
Advertisement