Satara Crime : हॉटेल व्यावसायिक मारहाणप्रकरणी वडूज पोलीस वादाच्या भोवऱ्यात
चोरीच्या खोटी तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीसमार्फत अमानुष मारहाण
वडूज : चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिकास मारहाण केल्याप्रकरणी वडूज पोलीस वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याबाबतची माहिती अशी, येथील एसटी कॅन्टीन चालक सागर मानसिंग कदम त्यांच्या हॉटेलवर पडलेल्या दरोड्याची फिर्याद देण्यासाठी वडूज पोलीस ठाण्यात गेले होते.
यावेळी खोटी तक्रार करून प्रशासनाला नाहक त्रास देतोस असे म्हणत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार होंगे व इतरांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
कदम यांनी जिल्हा पोलीसप्रमुख तसेच प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली आहे. तर कदम है आर्थिक व्यवहारातील लाखो रुपये बुडवण्याच्या उद्देशाने चोरीची खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करण्याबरोबर पोलीस दलाची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप माजी सैनिक सचिन यशवंत काळे यांनी केला आहे.