महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक दिमाखात

10:35 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुने बेळगावचाही सहभाग, आकर्षक सजीव देखाव्यांनी आणला मिरवणुकीला बहर

Advertisement

बेळगाव : पारंपरिक शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी वडगाव व जुने बेळगाव परिसरात भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग सजीव देखाव्यांच्या साहाय्याने सादर करण्यात आले. काही मंडळांनी मिरवणूक न काढता एकाच ठिकाणी स्टेजवरून देखावे सादर केले. देखावे पाहण्यासाठी वडगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांची गर्दी होती. पारंपरिक शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी वडगावमध्ये सजीव देखावे सादर केले जातात. यावर्षी वझे गल्ली, पाटील गल्ली, रयत गल्ली, कारभार गल्ली, सोनार गल्ली, दत्त गल्ली, रामदेव गल्ली तसेच जुने बेळगाव येथील शिवाजी युवक मंडळाच्यावतीने चित्ररथ काढण्यात आला. वझे गल्ली येथील मंडळाने सोनार गल्ली कॉर्नरवर मंडप घालून एकाच ठिकाणी देखावे सादर केले.

Advertisement

शिवराज्याभिषेक देखावा पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी

वझे गल्ली मंडळाने सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा पाहण्यासाठी शहापूर, वडगाव रोडवर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यामुळे चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला विलंब लागला. त्यामुळे सायंकाळी उशिराने मिरवणुकीला सुरुवात झाली. केवळ वडगावच नाही तर शहापूर, जुने बेळगाव, हिंदवाडी या परिसरातील शिवभक्त रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी हजर होते. ही मंडळे शनिवार दि. 10 रोजी बेळगावमध्ये होणाऱ्या मुख्य मिरवणुकीतही सहभागी होणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article