वडगाव पीकेपीएस संचालकांची बिनविरोध निवड
अध्यक्षपदी अमोल देसाई तर उपाध्यक्षपदी साक्षी कणबरकर
बेळगाव : विविधोद्देशीय प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ माधवपूर-वडगाव (पीकेपीएस) संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी अमोल देसाई, व्हा. चेअरमनपदी साक्षी कणबरकर, संचालकपदी माधुरी बिर्जे, देवकुमार बिर्जे, लक्ष्मण बाळेकुंद्री, दुर्गाप्रसाद जोशी, तानाजी भोसले, संतोष शिवणगेकर, गुरुराज शहापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. एकूण नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन नूतन चेअरमन अमोल देसाई यांनी दिले. संचालकांनी शेतकऱ्यांचा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरवला असून, यापुढेही अशाच पद्धतीने कार्य सुरू ठेवू, असे व्हा. चेअरमन साक्षी कणबरकर यांनी सांगितले. बिनविरोध निवड होण्यासाठी वडगाव व जुने बेळगाव येथील पंचमंडळ मनोहर हलगेकर, नितीन खन्नुकर, भाऊराव पाटील, संजय सातेरी, जयराज हलगेकर, कुलदीप भेकणे, अनंत कणबरकर, किरण देसूरकर यांनी सहकार्य केले.