For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडापाव विक्रेते मनवेल डिसोजांनी जपली सामाजिक बांधिलकी

12:28 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वडापाव विक्रेते मनवेल डिसोजांनी जपली सामाजिक बांधिलकी
Advertisement

दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या सावंतवाडीतील १० वर्षीय महेनुर शेखला केली ५ हजाराची मदत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी - माठेवाडा येथील रहिवासी महेनुर शेख या १० वर्षीय मुलीला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले असून तिच्या उपचारासाठी जवळपास 15 लाखाची आवश्यकता आहे. सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये बातमी व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समाजासह इतर समाजबांधव तिच्या मदतीसाठी पुढे येत आहेत .राजा शिवाजी चौक येथील रस्त्यावर गाडा लावून वडापाव विक्रीचा व्यवसाय करणारे मनवेल डिसोजा यांनी सदर मुलीला रोख पाच हजार रुपये आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे . सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्याशी सर्वप्रथम डिसोजा यांनी संपर्क साधला व आपण त्या मुलीला पाच हजार रुपये मदत करणार असल्याची माहिती दिली . त्यानंतर सदर मुलीच्या नातेवाईकांकडे रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली .त्याचप्रमाणे मनवेल डिसोजा यांनी अशाच प्रकारे यथाशक्ती आपण मित्रमित्रमंडळीकडून सदर मुलीच्या उपचारासाठी मदत मिळवून देणार अशी ग्वाही दिली.एक सर्वसामान्य वडापाव विक्रेता सढळ हाताने एवढ्या मोठ्या रक्कमेची मदत करू शकतो याबाबत मनवेल डिसोजा यांचे आभार व कौतुक राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे . याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, मुस्लिम हेल्प फाउंडेशनचे मोहसीन मुल्ला व तन्वीर शहा उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.