शाहू महाराजांची या वयात होणारी ससेहोलपट काँग्रेसचेच पाप- चंद्रदीप नरके
प्रयाग चिखली : वार्ताहर
काँग्रेसच्या नेत्याने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी उमेदवारी देऊन छत्रपती शाहू महाराज यांना गल्लोगल्ली , वाड्या - वस्त्यात फिरवायला लावले आहे .या आदरणीय व्यक्तिमत्त्वाची या वयात होणारी ससेहोलपट हे काँग्रेसचे पाप आहे . अशी टीका मा.आ. चंद्रदीप नरके यांनी केली आहे.
वडणगे ( ता. करवीर ) येथे झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड.वीरेंद्र मंडलिक म्हणाले, चिखली, वडणगे गावात आलेल्या महापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जनतेला हात देऊन खासदार किचन योजना सुरू केली. लोकांना वाचवण्यासाठी अन्नधान्य दिले. करवीर विधानसभा मतदारसंघात 260 कोटी 30 लाख रुपयांची विकास कामे सुरू केली. या विकासकामांच्या जोरावर संजय मंडलिक यांना विजयी करा.
भाजपाचे करवीर विधानसभा अध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले,ठ देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे.विकसित राष्ट्र बनवण्यासाठी मोदींना साथ द्या.ठ यावेळी संयोजक इंद्रजीत पाटील यांनी विद्यमान आमदार पी. एन. पाटील गेली पाच वर्षे गावात आले नाहीत, असा असा सवाल करून काही विघ्नसंतोषी लोकांनी गावतलावाचे काम बंद पाडल्याचा आरोप केला.
यावेळी स्वागत दिपक पाटील यांनी केले . तर प्रास्ताविक सयाजी घोरपडे यांनी केले .राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष हर्षवर्धन पोवार, करवीर अध्यक्ष शिवाजी देसाई, विश्वास बराले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, एस.आर. पाटील, राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, संचालक तानाजी पाटील, सर्जेराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष