For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 12 हजार पाळीव डुकरांना लस

10:27 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात 12 हजार पाळीव डुकरांना लस
Advertisement

रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न : घरोघरी मोहीम

Advertisement

बेळगाव : स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी पाळीव डुकरांना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. विसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात 21 हजार 784 डुकरे आहेत. त्यापैकी 12,435 डुकरांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, शेळ्या-मेंढ्या, डुक्कर आदींचा समावेश आहे. या जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक लस दिली जात आहे. स्वाईन फ्लू हा डुकरापासून उद्भवणारा आजार आहे. लागण झालेल्या डुकराच्या संपर्कात आल्यास मानवालादेखील याचा धोका आहे. याची खबरदारी म्हणून पशुसंगोपनने जिल्ह्यातील सर्व पाळीव डुकरांना लस दिली आहे. राष्ट्रीय रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांना वेगवेगळ्या लसी दिल्या जात आहेत. लाळ्या-खुरकत, लम्पी, ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लस देऊन जनावरांना आजारापासून दूर ठेवले जात आहे. त्याबरोबर डुकरांनाही स्वाईन आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अलीकडे पाळीव जनावरे पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याबरोबर जिल्ह्यात काही जण पाळीव डुकरांचे संगोपन करतात. यांना कोणत्याही आजाराची लागण होऊ नये, यासाठी प्रतिबंधक लस दिली जाते. तीन महिन्यांवरील सर्व डुकरांना लस टोचण्यात आली आहे. शेतकरी आणि पशुपालकांना दूध, अंडी, मांस यातून आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. मत्स्यपालन  व मधुमक्षिकापालनासह पशुपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन व्यवसाय विस्तारू लागला आहे. या व्यवसायांना गती देण्यासाठी वेळोवेळी लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

वर्षातून दोन वेळा लसीकरण

Advertisement

जिल्ह्यात 21 हजार 784 डुकरे आहेत. यापैकी 12,435 डुकरांना लस देण्यात आली आहे. स्वाईन फ्लूपासून दूर ठेवण्यासाठी वर्षातून दोन वेळा लस दिली जाते. दुसऱ्या टप्प्यात एकही डुक्कर लसीकरणापासून वंचित रहाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.