For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लसीकरणाची मिळणार ऑनलाईन माहिती

06:40 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
लसीकरणाची मिळणार ऑनलाईन माहिती
Advertisement

गरोदर महिला-नवजातांसाठी सुरू होणार यूविन पोर्टल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात गरोदर महिला आणि नवजातांच्या लसीकरणावरून चालू महिन्यात यूविन पोर्टलचा शुभारंभ होणार आहे. हे पोर्टल कोविन प्लॅटफॉर्मप्रमाणे कार्य करणार आहे. जर एखादी गरोदर महिला किंवा नवजात बाळ लसीकरणापासून वंचित राहिले तर त्याची माहिती ऑनलाईनच संबंधित क्षेत्राच्या आरोग्य टीमला मिळणार आहे आणि घरी जाऊन त्याचे लसीकरण केले जाणार आहे.

Advertisement

कोरोना महामारीदरम्यान कोविन प्लॅटफॉर्मद्वारे देशात 200 कोटीहून अधिक लसीकरण झाले होते. पूर्ण जगात हे सर्वाधिक प्रमाण होते. भारतात मागील अनेक वर्षांपासून गरोदर महिला आणि नवजातांचे लसीकरण केले जात आहे. मागील वर्षी या लसीकरणाने सुमारे 80 टक्क्यांचे लक्ष्य गाठले होते. अशा स्थितीत मोठ्या संख्येत गरोदर महिला आणि नवजात लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे म्हटले जाऊ शकते असे केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. अपूर्व चंद्रा यांनी नमूद केले आहे.

100 टक्के लक्ष्य गाठण्याची तयारी

लसीकरणाचे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी यूविन पोर्टल डिझाइन करण्यात आले आहे. सुमारे एक वर्षापासून हे प्लॅटफॉर्म देशाच्या काही हिस्स्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. आता हे राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची तयारी असल्याचे डॉ. चंद्रा यांनी सांगितले आहे.

दरवर्षी 3 कोटी गरोदर महिलांना मिळणार लस

चालू महिन्यात सादर केला जाणारा यूविन प्लॅटफॉर्म लसीकरणाचे ऑनलाईन व्यवस्थापन आहे. या तंत्रज्ञानाद्वारे देशात दरवर्षी 3 कोटीहून अधिक गरोदर महिला आणि दरवर्षी जन्म घेणाऱ्या सुमारे 2.7 कोटी मुलांचे लसीकरण आणि औषधांचा स्थायी डिजिटल नोंदही ठेवली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले आहे.

एकच पोर्टलमध्ये समायोजित करण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय डिजिटल मिशनचे एक लक्ष्य आरोग्य सेवांचा विस्तार करणे आणि ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रांमधील असमानता कमी करणे आहे. टेलिमेडिसीन, टेलिमानस आणि ई-रक्तकोष यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच अनेक पोर्टल संचालित आहेत आणि त्यांना एकाच पोर्टलमध्ये समायोजित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती डॉ. चंद्रा यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.