फोंड्यातील पोटनिवडणुकीनंतर भरणार मंत्रिमंडळातील रिक्त जागा
01:00 PM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली मंत्रिमंडळातील एक जागा फोंडा पोट निवडणुकीनंतर भरली जाईल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री सावंत यांनी फोंडा पोटनिवडणुकीतील विजयी आमदाराला मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे फोंडावासीयांची आशा वाढली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. फोंडा पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होईल. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
Advertisement
Advertisement