वडिलांचा विरोध पत्करून सिनेमासाठी याअभिनेत्रीने केले लिंग बदल ?
मुंबई
बॉलीवूडमध्ये येण्यासाठी तिथे करीअर करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण प्रत्येकाला तशी संधी मिळेलच असे नाही. अनेकांच्या बाबतीत तर संधी मिळते पण कुटुंबाचा पाठींबा मिळेलच असे नाही. विशेषः अभिनेत्रींच्या बाबतीत हे प्रामुख्याने होत असतं. तरीही आपल्या कामाप्रती आस्था आणि सिनेक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी चिकाटीने, मेहनतीने तग धरून राहतात. असेच काहीसे बॉलीवूडची अभिनेत्री वाणी कपूर हिच्या बाबतीत घडले आहे.वाणी कपूर हीने तिच्या वडिलांचा विरोध पत्करत बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवडूमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वाणी ही एका हॉटेलमध्ये काम करत होती. यादरम्यान तिच्या मनात अभिनय, सिनेमा क्षेत्र याप्रति विशेष ओढ निर्माण झाली. पण तिच्या वडिलांचा या निर्णयाल पूर्ण विरोध होता. तरीही वाणीने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. आणि आज ती कोट्यावधींची मालकीण आहे.वाणीने बॉलीवूडमध्ये काम करायचा निर्णय घेतल्यानंत वाणीला तिच्या वडिलांच्या रागाला, विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र तिच्या आईने तिची कधीच साथ सोडली नाही. वाणी मॉडेलिंग क्षेत्रात कार करत होती, हे ही तिच्या वडिलांना कधीही आवडलं नाही. कुटुंबाचा विरोध पत्करुन वाणीने बॉलीवूडमध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण केली.
या शिवाय विशेष म्हणजे वाणी कपूर हीने चंडीगढं करे आशिकी या सिनेमासाठी एका अशा मुलीची भूमिका साकारली, जी जन्माला मुलगा म्हणून आली आहे, पण लिंग बदलून मुलगी झाली आहे. शुद्ध देसी रोमान्स या सिनेमानंतर तर वाणीच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली.
रिपोर्टस् नुसार, वाणी कपूरची २०२२ सुमारे १० कोटींची संपत्ती आहे. तिचे दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वतःचे घर आहे. याशिवाय लक्झरीस गाड्याही आहेत. सिनेमा व जाहिरातींमधून वाणीची कोट्यावधी रुपयांची कमाई आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही वाणी कमाई करते. वाणी सोशल मिडीयावर सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत नेहमीच अपडेट्स शेअर करत असते.