For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाणीला मिळाला नवा चित्रपट

06:05 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाणीला मिळाला नवा चित्रपट
Advertisement

अपारशक्ती अन् परेश रावल यांचीही मुख्य भूमिका

Advertisement

जुग जुग जियो, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि सत्यप्रेम की कथा या चित्रपटांच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा फॅमिली ड्रामा चित्रपटांचा काळ परतत असल्याचे चित्र आहे. पुढील काही महिन्यांमध्ये अनेक फॅमिली ड्रामा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आता या यादीत आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले गेले असून याचे दिग्दर्शन नवजोत  गुलाटी करत आहेत. या चित्रपटात वाणी कपूर, अपारशक्ती खुराना आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाची निर्मिती निकी विक्की भगनानी फिल्म्सकडून केली जाणार आहे.  आधुनिक काळात बिघडणाऱ्या नात्यांची पार्श्वभूमी असलेली कहाणी दर्शविली जाणार असून यात वाणी, परेश रावल आणि अपारशक्ती खुराना हे कलाकार दिसून येतील.

Advertisement

लवकरच लंडनमध्ये याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. चित्रपटात वाणी आणि अपारशक्ती हे भाऊबहिणीची भूमिका साकारणार आहेत. याची कहाणी नवजोत गुलाटी यांनीच लिहिल आहे. या चित्रपटापूर्वी नवजोत यांचा आणखी एक चित्रपट ‘पूजा मेरी जान’ प्रदर्शित होणार आहे. यात मृणाल ठाकूर आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत आहेत. नवजोत आणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

वाणी आगामी काळात ‘रेड 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे. यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.