For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल येथील व्ही. पी कॉलेज ऑफ फार्मसीला 'नॅक' B++ चे मानांकन

03:28 PM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल येथील व्ही  पी कॉलेज ऑफ फार्मसीला  नॅक  b   चे मानांकन
Advertisement

महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
माडखोल येथील शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात B++ ही श्रेणी मिळाली आहे. नॅक’ मानांकन मिळाल्यामुळे या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.नॅकच्या माध्यमातून देशपातळीवर उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची गुणवत्ता तपासली जाते. या प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांचे अध्यापन कौशल्य व संशोधन कार्य, विद्यार्थी व पालक अभिप्राय, समाज उपयोगी कार्यक्रम, क्रीडा व सांस्कृतिक विभागाची कामगिरी, पर्यावरण पुरकता यांचा प्रामुख्याने समावेश असतो. 'नॅक’च्या तज्ज्ञ समितीने मागच्या आठवड्यात १८ व १९ ऑक्टोबर रोजी माडखोल येथील व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास भेट देऊन गेल्या पाच वर्षांची महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली होती. 'नॅक’च्या या मुल्यांकन प्रक्रियेत सर्व विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग नोंदवला. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि नामांकित कंपन्यात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार महाविद्यालय म्हणून माडखोल येथील व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसीची ओळख आहे. व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसीला 'नॅक' B++ चे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे तसेच महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. संदेश सोमनाचे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.