व्ही. एन. शिवणगी स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
11:20 AM Dec 12, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेलगाम एज्युकेशन सोसायटीच्या व्ही. एन. शिवणगी कन्या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात झाले. प्रमुख पाहुणे किरण जाधव यांच्या हस्ते आकाशात कबुतरे उडवून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुहास सांगलीकर अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. क्रीडा शिक्षिका कविता पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींकडून पथसंचलन करण्यात आले. प्राची रेडेकर व महेश्वरी पुणेद यांनी क्रीडा ज्योत फिरविली. तिर्था सांबरेकरने शपथ देवविली. विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापिका मिनाक्षी वडेयर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देऊन सर्वांचे स्वागत केले. सहशिक्षिका संजीवनी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article