For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्ही. के. सक्सेना यांना न्यायालयाचा दिलासा

06:22 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्ही  के  सक्सेना यांना न्यायालयाचा दिलासा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दाखल केलेल्या 25 वर्षे जुन्या फौजदारी मानहानी खटल्यातून लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायदंडाधिकारी राघव शर्मा यांनी या खटल्याचा निकाल दिला. हा खटला 10 नोव्हेंबर 2000 रोजी प्रकाशित झालेल्या एका जाहिरातीशी संबंधित होता. त्यामध्ये नर्मदा बचाओ आंदोलनावर टीका करताना सरदार सरोवर प्रकल्पाला पाठिंबा देण्यात आला होता. हा दोन्ही पक्षांमधील परस्पर कायदेशीर वादाचा विषय आहे.

2006 मध्ये सक्सेना यांनी एका टीव्ही कार्यक्रमात केलेल्या विधानांसाठी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना यापूर्वी दोषी ठरवण्यात आले होते. तथापि, 24 जानेवारी 2026 रोजी साकेत न्यायालयाने पुराव्याअभावी मेधा पाटकर यांची निर्दोष मुक्तता केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.