For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्ही. चंद्रशेखर आता सीबीआय सहसंचालक

06:25 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
व्ही  चंद्रशेखर आता सीबीआय सहसंचालक
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

गुजरात केडरचे 2000 बॅचचे आयपीएस अधिकारी व्ही. चंद्रशेखर यांची सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर सध्या सुरत रेंज आयजी म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारने चंद्रशेखर यांच्या नियुक्तीचे आदेश 7 नोव्हेंबर रोजी जारी केले असून आता ते सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून काम करतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे, असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. याआधी चंद्रशेखर यांनी सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक आणि उपमहानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे.

व्ही. चंद्रशेखर हे कुशाग्र अधिकारी म्हणून ओळखले जातात.  मूळचे तामिळनाडूचे असलेले व्ही. चंद्रशेखर यांनी कृषी विषयात पीजी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी काही काळ अहमदाबाद रेंज आयजी म्हणूनही काम केले आहे. नुकताच सुरतच्या कडोदरा अपहरण प्रकरणाचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला. गुजरातच्या आयपीएसच्या कार्यपद्धतीत नुकताच मोठा बदल झाला आहे. त्यानंतर व्ही. चंद्रशेखर यांच्याकडे सुरत रेंजच्या आयजीची कमान देण्यात आली. पूर्वी ते सीआयआयमध्ये तैनात असताना हैदराबादमध्ये कार्यरत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.