Sarpancha Reservation: उत्तुर, मडिलगे अनुसूचित महिला, कसं आहे आजऱ्यातील सरपंच आरक्षण
काही ठिकाणच्या आरक्षणात फेरबदल झाल्यामुळे काहींना लॉटरी लागली
आजरा : जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यावेळी काही ठिकाणच्या आरक्षणात फेरबदल झाल्यामुळे काहींना लॉटरी लागली. तर काहीजण नाराज झाले.
आरक्षण बदलाचा काहींना फटका बसला आहे. तर काही जणांनी आरक्षणावर आक्षेपही घेतला आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही दिला आहे. तर काही इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. आजरा तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीकरिता फेरआरक्षण सोमवार 21 रोजी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आरक्षण पार पडले.
आरक्षण सोडतीमध्ये पेरणोली, गवसे गावचे सरपंच सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिले आहे. खेडे, वाटंगी, गजरगांव, सिरसंगी, देवर्डे या प्रमुख ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. तर उत्तूर व मडिलगे ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जाती स्त्राr प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.
तहसीलदार समीर माने यांनी सरपंचपद आरक्षणाच्या प्रक्रियेची माहिती दिली. सर्वप्रथम अनुसुचित जाती व त्यातील महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. स्वराली सावंत, शामल जाधव या व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थीनींच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मंडल अधिकारी सुंदर जाधव, अव्वल कारकून संभाजी माळी, संभाजी गाडीवड्ड, महसूल सहाय्यक मारूती कुरबेट्टी, चंद्रकांत पालकर यांनी ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली.
यावेळी माजी सभापती अल्बर्ट, कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई, संचालक रणजित देसाई, अनिल फडके, राजू होलम, विजय केसरकर, उत्तम रेडेकर, आप्पासाहेब सरसदेसाई, राजू पोतनीस, दशरथ अमृते, विलास पाटील, दशरथ आजगेकर, सहदेव नेवगे, कानोली सरपंच सुषमा पाटील, इंद्रजीत देसाई, विजय थोरवत यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आजरा तालुक्यातील सरपंचपद आरक्षण खालीलप्रमाणे
► अनुसुचित जाती स्त्री- उत्तूर, मेढोंली-बोलकेवाडी, हाजगोळी खुर्द, मडिलगे
► अनुसुचित जाती - हरपवडे, देऊळवाडी, होन्याळी, सुळे
► नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री - किटवडे, चिमणे, पेद्रेवाडी, निंगुडगे, बेलेवाडी हु।।, साळगांव, भादवणवाडी, हाळोली-मेढेवाडी-दर्डेवाडी, धामणे, सुलगाव
► नागरीकांचा मागास प्रवर्ग - कोळिंद्रे, पेंढारवाडी, होनेवाडी, चितळे-जेऊर, भादवण, महागोंड- महागोंडवाडी, मुम्मेवाडी, वडकशिवाले, खानापूर, बहिरेवाडी
► सर्वसाधारण स्त्री राखीव - सरोळी, सिरसंगी-यमेकोंड, हालेवाडी, देवर्डे, कोवाडे, वाटंगी-मोरेवाडी, मुरूडे, देवकांडगांव-विनायकवाडी, कोरीवडे, लाटगांव-सातेवाडी, दाभिल, सुळेरान, आवंडी, शेळप, मासेवाडी, श्रृंगारवाडी-उचंगी, गजरगांव, चाफवडे, करपेवाडी-दु।।, झुलपेवाडी, वेळवट्टी, मसोली, खेडे-मुंगूसवाडी
► सर्वसाधारण - खोराटवाडी, मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, गवसे, एरंडोळ, हात्तिवडे, किणे, कासारकांडगाव, लाकुडवाडी, सरंबळवाडी, वझरे, पारपोली, कानोली, पोळगाव, सोहाळे, इटे, चांदेवाडी, बुरूडे, आर्दाळ, पेरणोली, हाजगोळी खु।.