राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद उत्तराखंडला
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी जानेवारी 28 ते 14 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. तशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बुधवारी दिली. या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत त्याला मंजुरी मिळावयाची असल्याचेही त्यांनी स्पध्ट केले. आयओएची सर्वसाधारण बैठक 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आपल्या राज्यात परतल्याने आम्ही रोमांचित झालो आहोत. या स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते,’ असे आयओए अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या. ‘देशभरातील अॅथलीट्सना आपले कौशल्य दाखविण्याची चांगली संधी या स्पर्धेत मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण 38 क्रीडा प्रकार घेतले जाणार असून दहा हजारहून अधिक खेळाडू, पदाधिकारी, प्रशिक्षक सहभागी होणार आहेत.,’ असेही त्या म्हणाल्या. मागील वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्या आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राने 228 पदके जिंकत पहिले स्थान मिळविले होते, त्यात 80 सुवर्णपदकांचा समावेश होता.