महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या अडचणीत वाढ

06:37 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 2010 मध्ये वाराणसीत नोंद गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे.

2010 मध्ये मारहाण आणि शांतता भंग केल्याप्रकरणी तत्कालीन मायावती सरकारने अजय राय विरोधात गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. अजय राय यांच्यावर 27 गुन्हे असल्याने उच्च न्यायालयाने संबंधित खटला रद्द करण्यास नकार दिला होता. यानंतर अजय राय यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अजय राय आणि अन्य चार जणांच्या विरोधात 14 वर्षांपूर्वी वाराणसी येथील चेतगंज पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. 2010 मध्ये नोंद या गुन्ह्याप्रकरणी तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी 28 ऑक्टोबर 2011 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

याप्रकरणी वाराणसीच्या एमपी-एमएलए विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राय यांनी याचिका दाखल करत सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्याच्या विरोधात 27 गुन्हे नोंद असल्याचे म्हणत न्यायालयाने सुनावणी रद्द करण्याकरता कुठलाच ठोस आधार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article