For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मसुरे सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी उत्तम राणे

04:14 PM Mar 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मसुरे सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी उत्तम राणे
Advertisement

तर उपाध्यक्षपदी नंदा शिंगरे यांची निवड

Advertisement

मसुरे प्रतिनिधी

मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र उत्तम राणे तर उपाध्यक्षपदी श्रीम. नंदा शिंगरे यांची निवड एकमताने करण्यात आली.ही निवड सन २०२५-२०२६ ते सन २०३०-२०३१ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. या संस्थेच्या सचिव पदी श्री रमेश परब आणि खजिनदार पदी श्री संजय बागवे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून श्री प्रदिप भोगले,श्री विठ्ठल लाकम, श्री हेमंत परब, सौ. पल्लवी साटले आणि तज्ञ संचालक पदी श्री मोहन बागवे,सौ. राधिका परब यांची निवड मुंबई येथे करण्यात आली.यावेळी बोलताना उत्तम राणे म्हणाले, मसुरे सहकारी पतपेढी ही मसुरे गाव आणि तळागाळातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभी राहिलेली संस्था असून यापुढेही ते अतिशय पारदर्शक आणि सर्वांना बरोबर घेऊन कारभार केला जाईल आणि ही पतसंस्था राज्यांमध्ये नंबर वन आणण्यासाठी आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील. नवीन संचालक मंडळाला विविध मान्यवरांनी तसेच मसुरे ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्यात.

Advertisement

Advertisement
Tags :

.