For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तम पाटील यांचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

10:59 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तम पाटील यांचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली भेट

Advertisement

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम पाटील काँग्रेस पक्षातर्फे प्रचार करणार आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, चिकोडीमध्ये लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे ज्येष्ठ सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या घरी भेट देऊन पालकमंत्री जारकीहोळी यांनी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली. उत्तम पाटील हे काँग्रेस पक्षाचा एक भाग आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याबरोबर आज चर्चा झाली असून काँग्रेस पक्षातर्फे प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.