For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कावड’ नेण्यासाठी दातांचा उपयोग

06:34 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘कावड’ नेण्यासाठी दातांचा उपयोग
Advertisement

उत्तर भारतात, विशेषत: उत्तर प्रदेशात श्रावण महिन्यात ‘कावड’ नेण्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्याची प्राचीन काळापासून प्रथा आहे. या उत्सवात पवित्र गंगाजल एका घागरीत किंवा कावडीत भरुन ते पायी चालत खांद्यावरुन, सायकल वरुन किंवा मोटारसायकलवरुन भाविक ते आपल्या घरापर्यंत नेतात. अशा कावडी नेणाऱ्यांची संख्या लक्षावधी असते. यंदाच्या कावड महोत्सवाला आता प्रारंभ झाला आहे. सध्या अशी कावड नेणारा एक कावडिया ज्याच्या त्याच्या चर्चेचा विषय झाला आहे. त्याचा भक्तीभाव आणि निष्ठा पाहून त्याचे कौतुक केले जात आहे.

Advertisement

या भाविकाचे नाव नरेंद्र जाट असे असून तो अलिगड जिल्ह्यातील छज्जूपूर येथील आहे. इतर कावडियांप्रमाणे तो आपली कावड खांद्यावरुन किंवा बाईकवरुन नेत नसून त्याने ती कावड आपल्या कारमध्ये ठेवली आहे. ही कार तो चक्क आपल्या दातांनी ओढत आपल्या घरापर्यंत नेत आहे. अवजड वाहनाला किंवा वस्तूला दोरी बांधून ती दोरी आपल्या दातांमध्ये धरुन ते वाहन किंवा ती वस्तू खेचत नेण्याचे प्रयोग अनेकजण करतात. आपले शारिरीक सामर्ध्य अशा प्रकारे दाखविले जाते. तथापि, हरिद्वार पासून आपल्या घरापर्यंतचे अंतर हा भाविक कार दातांनी ओढून पार करणार आहे. त्याची ही अद्भूत कावड यात्रा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. त्याने हा ‘पण’ केला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्याने त्याचा पण पूर्ण केला, तर हरिद्वार ते छज्जूपूर हे इतके मोठे अंतर कार आणि तिच्यातील कावड दातांनी खेचणारा तो जगातील प्रधम भाविक ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या यात्रेचा प्रारंभ त्याने 10 जुलैपासून केला आहे. त्याने आपल्या कारच्या टपावर 11 लीटर गंगाजल असलेली कावड आणि भगवान शिवशंकराची एक मूर्ती स्थापित केली आहे. हरिद्वार ते छज्जूपूर हे अंतर पार करण्यासाठी त्याला एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.