महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उषा चिलुकुरी यांचा भारताशी संबंध

06:40 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची उमेदवारी घोषित झाली आहे. ट्रंप यांनी उपाध्यक्षपदासाठीचे सहकारी म्हणून जे. डी. व्हान्स यांची निवड केली आहे. व्हान्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी व्हान्स या भारतीय वंशाच्या असल्याने त्यांची सध्या चर्चा होत आहे.

Advertisement

जे. डी. व्हान्स हे ओहियो प्रांतातून निवडून आलेले सिनेटर आहेत. ट्रंप यांनी ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तर व्हान्स हे उपाध्यक्ष होतील. व्हान्स हे अवघ्या 39 वर्षांचे आहेत. त्यांच्या पत्नी भारतीय वंशाच्या असून त्यांचे नाव उषा चिलुकुरी-व्हान्स असे आहे. त्यांचे माहेरचे कुटुंब मूळचे भारतातील आंध्र प्रदेशचे आहे. उषा चिलुकुरी यांनी त्यांचा विवाह व्हान्स यांच्याशी झाल्यापासून त्यांना राजकारण, समाजकारण आणि व्यवसायात मोलाचे साहाय्य केले आहे.

उच्चशिक्षित आणि निगर्वी

चिलुकुरी या अमेरिकेच्या नागरीक आहेत. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायीक झालेले आहे. त्या उच्चशिक्षित असून येल जर्नल ऑफ लॉ अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी येल येथे चार वर्षे समाजकार्य केले आहे. त्यांना बिल गेट्स् न्यासाची फेलोशिप मिळाली होती. त्यांनी केंब्रिज येथेही शिक्षण प्राप्त केले आहे.

हिंदू पद्धतीने विवाह

जे. डी. व्हान्स यांच्याशी त्यांचा विवाह 2014 मध्ये अमेरिकेतील केंचुकी येथे झाला. हा विवाह हिंदू पद्धतीने पुरोहितांच्या अधिपत्यात साजरा करण्यात आला होता. या दांपत्याला तीन अपत्ये आहेत. उषा यांच्या मौलिक सहकार्यानेच आपण आपण राजकारण, समाजकारण आणि व्यवसायात इथपर्यंत पोहचलो आहोत, अशी  त्यांची भलावण त्यांचे पती व्हान्स यांनी पेलेली आहे. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या असून त्यांच्यामुळे मी माझ्या ख्रिश्चन धर्माकडे अधिक आकर्षिला गेलो. विवाहापूर्वी मी धर्म मानत नव्हतो, असेही व्हान्स यांनी मोकळेपणाने मान्य केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article