अन्न गिळण्यासाठी करतो डोळ्यांचा वापर
जगाचा सर्वात अनोखा जीव
जगात अनेक अनोखे जीव आढळून येतात, परंतु बेडकाची पद्धत सर्वात वेगळी मानली जाते. हा जीव स्वत:चे अन्न गिळण्यासाठी डोळ्यांची देखील मदत घेतो. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही यामागे एक रंजक जैविक प्रक्रिया काम करते, ज्याला विज्ञानात एक खास प्रकारचे अडॉप्टेशन मानले जाते.
बेडुक स्वत:च्या शिकारीला चावू शकत नाही, तो किड्यांना किंवा छोट्या जीवांना थेट गिळतो. जेव्हा एखाद्या मोठ्या शिकारीला पकडतो, तेव्हा गिळताना त्याचे डोळे आतील बाजूने ढकलले जातात, हे एक खास तंत्रज्ञान असून जे भोजनाला गळ्यापर्यंत पोहोचविण्यास मदत करते.
बेडुक जेव्हा स्वत:च्या डोळ्यांना खालच्या बाजूने दाबतो, तेव्हा तो तोंडाच्या दिशेने हलका दबाव निर्माण करतो. हा दबाव शिकारीला हळूहळू गळ्याच्या दिशेने ढकलण्यास मदत करतो, म्हणजेच त्याचे डोळे एक प्रकारे ‘पुश’ देण्याचे काम करतात.
शरीराच्या रचनेची कमाल
बेडकाच्या डोक्याचा वरील हिस्सा आणि डोळ्यांदरम्यान टणक हाड नसते. तेथे लवचिक ऊती अस्तित्वात असतात, ज्यामुळे डोळे सहजपणे आतील बाजूला जाऊ शकतात, याचमुळे ही प्रक्रिया शक्य होत असते. बेडकाची जीभ पुढील बाजूला जोडलेली असते, ज्यामुळे ती वेगाने बाहेर काढून बेडुक शिकार पकडत असतो. परंतु ही जीभ शिकारीला आत ढकलण्यास अधिक उपयुक्त नसते. याचमुळे गिळताना डोळ्यांची भूमिका आणखी वाढते.
बेडकाकडे भोजन चावण्याची क्षमता अत्यंत कमी असते. तो स्वत:च्या शिकारीला पूर्णपणे गिळतो. त्याचे डोळे त्याला चहुबाजूला पाहण्यास मदत करतात तसेच गिळण्याच्या प्रक्रियेतही महत्त्वाचे योगदान देतात. अशाप्रकारे बेडकाचे डोळ्यांच्या मदतीने भोजन गिळणे हे निसर्गाच्या एका अनोख्या रचनेचे उदाहरण आहे.