For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निधीचा गावच्या विकासासाठी वापर करा

02:46 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
निधीचा गावच्या विकासासाठी वापर करा
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे : उगार बी. के. येथे कायक ग्राम आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : उगार बी. के. ग्रामपंचायतीने 2025-26 या आर्थिक वर्षात 100 टक्के करवसुली करून आदर्श कामगिरी बजावली आहे. या निधीचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्यरित्या वापर करावा. ग्रा. पं. हद्दीत पिण्याचे पाणी, वाचनालय, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्रे सुस्थितीत कार्यरत असून ही कार्यपद्धती यापुढेही कायम ठेवावी. विकासात मागे राहिलेल्या ग्रा. पं. तींमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे हा ‘कायक ग्राम“ कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासाठी जिल्ह्यात निवडलेल्या सर्व गावांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्यात येत आहे, अशी माहिती जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिली.

कागवाड तालुक्मयातील उगार बी. के. ग्रा. पं. कार्यालय आवारात जि. पं. ता. पं., ग्रा. पं. व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायक ग्राम“ कार्यक्रमाच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. येथील आमदार आदर्श कन्नड मुलांच्या व मुलींच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्मार्ट क्लासरूम तसेच सातवीच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पाहणी केली. गणिताचे उदाहरण सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी पुष्प देऊन कौतुक केले.

Advertisement

बालसंगोपन केंद्राला भेट

यानंतर राहुल शिंदे यांनी बालसंगोपन केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची तपासणी करून बालकांची योग्य काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच एनआरएलएम संजीविनी संघटनेच्या कार्यालयाला भेट देऊन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व हस्तकला वस्तूंची पाहणी केली.  2025-26 मध्ये कागवाड तालुक्मयातील सर्व 8 ग्रा. पं. तील 100 टक्के करवसुली करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या पीडीओंचा सन्मान करण्यात आला.

समस्या सोडविण्याचे आश्वासन

कार्यक्रमानंतर राहुल शिंदे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेऊन आवश्यक योजना आखून विकासकामे राबविण्याचे आश्वासन दिले. यावेळी योजना संचालक रवी बंगारेप्पनवर, कागवाड ता. पं. ईओ  वीरण्णा वाली,  ता. पं. ईओ शिवानंद कल्लापूर, साहाय्यक संचालक ए. डी. अन्सारी, शिवानंद सनाळ, पीडीओ नागप्पा कांबळेसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.