For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रांसाठी महिलांच्या रक्ताचा वापर

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
चित्रांसाठी महिलांच्या रक्ताचा वापर
Advertisement

2000 वर्षांपूर्वीची चीनमधील खडकांवरील चित्रं

Advertisement

चीनमध्ये सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी खडकांवर काढण्यात आलेली चित्रं आजही अस्तित्वात आहेत. या चित्रांनी तीव्र उष्णता, अतिवृष्टी, आर्द्रता आणि वादळांचा सामना केला, तरीही त्यांचा रंग अन् आकृती दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहिली आहे. आता वैज्ञानिकांनी या प्राचीन चित्रांच्या मजबुतीचे एक अत्यंत चकित करणारे रहस्य उघड केले आहे. एका नव्या संशोधनानुसार या चित्रांच्या निर्मितीकरता मानवी रक्ताचा वापर केला जात होता. या रक्ताचा स्रोत अलिकडेच अपत्याला जन्म दिलेल्या महिला असू शकता, म्हणजेच प्रसूतीदरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावातील रक्ताचा या चित्रांकरता वापर केला जात होता असे संशोधकांचे मानणे आहे.

2 हजार वर्षे जुनी चित्रं

Advertisement

दक्षिण चीनमध्ये व्हिएतनाम सीमेनजीक सुमारे 260 किलोमीटर लांब या भागात ठिकठिकाणी खडकांवर निर्मित हजारो वर्षे जुनी चित्रं अस्तित्वात आहेत. या चित्रांना हुआशान रॉक आर्ट नावाने ओळखले जाते. गुआंग्शी स्वायत्त क्षेत्रातील हे ठिकाण माणूस, प्राणी नौका, शस्त्रास्त्रs आणि संगीतवाद्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रांच्या निर्मितीचे क्षेत्र प्राचीन लुयोयूए लोकांना दिले जाते. हे लोक चीन अन् व्हिएतनामच्या सीमावर्ती भागांमध्ये राहत होते असे मानले जाते. या ऐतिहासिक ठिकाणाला 2016 साली युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्यात आले होते.

तीव्र उष्णता, अतिवृष्टी, वादळांचा मारा

या चित्रांचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे याचा कालावधी नाही. ही चित्रं ज्या भागात आहेत, तेथील हवामान अत्यंत प्रतिकूल आहे. येथे तीव्र उष्णता आणि आर्द्रतायुक्त वातावरण राहते. अतिवृष्टी होते आणि अनेकदा वादळं येत असतात. अशा हवामानात हजारो वर्षांपर्यंत खडकांवर रंग टिकून राहणे वैज्ञानिकांसाठी दीर्घकाळापर्यंत कोडं ठरले होते. आता वैज्ञानिकांना याचे चकित करणारे उत्तर मिळाले आहे.

रंगात रक्त मिसळलेले

जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित एका नव्या अध्ययनानुसार या चित्रांच्या निर्मितीकरता वापरण्यात आलेल्या मिश्रणात चुना, लाल माती आणि प्राण्यांसोबत मानवी रक्तही मिसळण्यात आले होते. संशोधकांनी शानडोंग विद्यापीठ आणि गुआंग्शी म्युझियम ऑफ एंथ्रोपोलॉजीसोबत मिळून या चित्रांच्या रंगांच्या छोट्या छोट्या तुकड्यांचे अध्ययन केले आहे. तपासणीत सर्व रंग नमुन्यामंध्ये सीरम प्रोटीन मिळाले. हे रक्तातील एक महत्त्वपूर्ण हिस्स असते, एवढेच नाही तर वैज्ञानिकांना मानवी रक्ताशी निगडित असे प्रोटीनही मिळाले आहेत, जे प्रसुतीशी संबंधित असतात. याचमुळे वैज्ञानिकांनी वापरण्यात आलेले मानवी रक्त अलिकडेच अपत्याला जन्म दिलेल्या महिलांकडून घेतले गेलेले असू शकते असा अनुमान व्यक्त केला आहे. संशोधनाचा आणखी एक रंजक पैलू समोर आला आहे. वैज्ञानिकांनुसार या प्रक्रियेत अत्यंत अधिक रक्ताची आवश्यकता नव्हती. केवळ 8 मिलिलिटर रक्ताने एक चौरस किलोमीटर क्षेत्राला झाकणारा रंग तयार केला जाऊ शकत होता.

रक्तातील काही घटक चुन्यासोबत मिसळून एका खास प्रकारचे कॅल्शियम कार्बेनेट तयार केले जात होते. यामुळे रंग खडकाच्या पृष्ठभागासोबत अत्यंत मजबुतीने जोडला जात होता. म्हणजेच हा रंक गेवळ खडकाच्या वर चिकटलेला नव्हता, तर एकप्रकारे चुनादगडाच्या पृष्ठभागासोबत जोडला गेला होता.  संशोधकांनी इतक्य मजबुतीला असाधारण ठरवत रक्ताचा नमुना मिळविण्यासाठी इलेक्ट्रिक ड्रिलचा वापर करावा लागल्याची माहिती दिली आहे. खडकामधून जेथे कॅल्शियम कार्बोनेटचे घर्षण झाले होते. तेथे रंग तुलनेत सहजपणे निघू शकला. वेगवेगळ्या ठिकाणी रंगाचे मिश्रण एकसारखे नव्हते असेही संशोधनातून कळले. एका ठिकाणाहून मिळालेल्या रंगात सुमारे 97 टक्के मानवी रक्त होते, तर नजीकच्या अन्य ठिकाणाच्या नमुन्यात जवळपास एक तृतीयांश हिस्सा प्राण्याच्या रक्ताचा होता. यातून प्राचीन लोक रंग तयार करण्यासाठी मानवी अन् प्राण्यांच्या रक्ताचा वेगवेगळ्या प्रमाणात वापर करायचे हे कळते.

लुयोयूए समाज

ऐतिहासिक नोंदीत लुओयूए समाजाला मातृसत्ताक ठरविण्यात आले आहे. प्राचीन चिनी दस्तऐवजांमध्ये त्यांच्या सामाजिक स्वरुप अन् नात्यांवरून वेगवेगळे तपशील मिळतात. संशोधकांनुसार दक्षिण-पश्चिम चीन अन् लिंगनान भागातील अनेक स्थानिक समाजांमध्ये हान राजघराण्याच्या काळापर्यंत महिलांची सामाजिक भूमिका अत्यंत मजबूत होती. हुआशान येथील ही चित्रं केवळ प्राचीन कलेचे नमुने नाहीत. हे त्या काळातील लोकांचे जीवन, त्यांच्या मान्यता, सामाजिक व्यवस्थेची झलकही दाखवतात.

Advertisement
Tags :

.