For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लॅक टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर

06:42 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्लॅक टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर
Advertisement

अमेरिकेकडून स्वत:च्या रहस्यमय शस्त्रास्त्राद्वारे स्ट्राइक

Advertisement

अमेरिकेच्या नौदलाने इराणवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात आर्ले बर्क क्ला डिस्ट्रॉयर युद्धनौकेतून आरजीएम-109 टॉमहॉक लँड अटॅक क्षेपणास्त्र डागताना दाखविण्यात आले आहे. परंतु एका छायाचित्राने जगभरातील सैन्य विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात ब्लॅक टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र दिसून आले आहे. व्हाइट टॉमहॉक क्षेपणास्त्र अनेकदा पाहिले गेले आहे, परंतु ब्लॅक वेरिंएट पहिल्यांदाच एखाद्या हल्ल्यात पाहिले गेले आहे.

सर्वसाधारणपणे क्षेपणास्त्रांना पुसट करड्या रंगाने रंगविले जाते आणि अमेरिकेत ही हीच परंपरा आहे. परंतु काळ्या रंगाने क्षेपणास्त्राला रंगविणे नवे आहे. या क्षेपणास्त्राचा रंग युएस नेव्हीच्या ताफ्यातील आणखी एक क्षेपणास्त्र स्टेल्थी एजीएम-158सी लाँग-रेज अँटी-शिप मिसाइलशी मिळताजुळता आहे. हे अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र काळ्या कोटिंगमध्ये दिसले आहे.

Advertisement

काळ्या रंगात असल्याने पाण्यावरून उडताना क्षेपणास्त्र पाहणे अवघड ठरू शकते. याचबरोबर रडार-एज्बॉर्बेंट आणि इन्फ्रारेड सप्रेसिव्ह प्रॉपर्टीज असणेही याचा मोठा लाभ असू शकतो. हे खासकरून टीएलएमससाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.