For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर

06:22 AM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर
Advertisement

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर वापराची मुभा देणारे विधेयक विधानसभेत संमत : विरोधी पक्षाचा सभात्याग

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याची संधी देणारे ग्रामस्वराज आणि पंचायतराज दुरुस्ती विधेयक-2026 विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सभात्यागात संमत करण्यात आले. या दुरुस्ती विधेयकावरील चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये तीव्र खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला होता.

Advertisement

ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांनी सदर विधेयक सोमवारी विधानसभेत मांडले. ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करणे हा देखील यामागचा हेतून असल्याचे त्यांनी म्हटले.

ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापरणे, हा या विधेयकाचा उद्देश आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे, हा यामागील हेतू असल्याचे सरकारने म्हटले आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 326 अन्वये, लोकांच्या लोकशाही इच्छेचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडलया पाहिजेत. तसेच मतपत्रिकेची गोपनीयता सुनिश्चित करण्याबरोबरच लोकशाही प्रक्रियेची पवित्रता जपली पाहिजे. ईव्हीएमवरील लोग्कांचा विश्वास कमी होत आहे. राजकीय पक्ष, तज्ञ आणि स्वयंसेवी संस्था निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तथापि, निवडणूक आयोग कोणतेही उत्तर देत नाही. अनेक राज्यांमध्ये मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्यात आल्या आहेत, असे समर्थकही प्रियांक खर्गे यांनी केले.

यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक, आमदार व्ही. सुनीलकुमार, सुरेशकुमार, अश्वत्थ नारायण यांनी सरकारवर परखड टीका केली. तसेच राज्य सरकारच्या धोरणावर आक्षेप घेतला. विधेयकावर टीका करताना आर. अशोक यांनी, ईव्हीएम काँग्रेसनेच आणले होते. आता पराभवाच्या भीतीमुळे त्यावरच ठपका ठेवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएमविषयी विश्वासार्हता व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांवर विश्वास नसलेले हे सरकार फसवणूक करत आहे. तुघलकी कारभार  सुरू आहे, अशी टीका केली. विधेयकावरील चर्चा वादळी ठरत विधेयकाच्या प्रती फाडून सभात्याग केला. त्यांच्यामागे भाजपचे इतर आमदारही सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर आवाजी मतदानाने विधेयक संमत करण्यात आले.

Advertisement
Tags :

.